पावसाचे थैमान, काजळी नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 19:13 IST2017-10-14T19:13:55+5:302017-10-14T19:13:55+5:30
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरासह तालुक्याला पुन्हा एकदा परतीच्या पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे भातशेती झोपू गेली, अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. याचा फटका साखरपा परिसरासह निनावे, ओझरे, खडीकोळवण येथील भातशेती पावसाने संपवूनच टाकली.

पावसाचे थैमान, काजळी नदीला पूर
साखरपा , दि. १४ : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरासह तालुक्याला पुन्हा एकदा परतीच्या पावसाने झोडपून काढले.
मुसळधार पावसामुळे भातशेती झोपू गेली, अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. याचा फटका साखरपा परिसरासह निनावे, ओझरे, खडीकोळवण येथील भातशेती पावसाने संपवूनच टाकली.
मुसळधार पावसाचा फटका साखरपा-देवरुख रस्त्यावरील मोर्डे खिंडीलगत दरड कोसळली आहे. संभाव्य पावसाचा जोर असाच कायम राहिला तर साखरपा-देवरुख रस्त्याला दरड कोसळण्याचा संभव अधिक आहे.