शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एमआयडीसीच्या प्रदूषणामुळे दाभोळ खाडीत मृत माशांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 4:19 PM

अखिल दाभोळ खाडी भोई समाज संघर्ष समितीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

- शिवाजी गोरेदापोली : लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत अनेक मासे मृत अवस्थेत आढळले. या दूषित पाण्यामुळे दाभोळ खाडीतील मासे वारंवार मरत असल्याने काही जाती दुर्मीळ तर काही जाती नामशेष झाल्या आहेत, त्यामुळे दाभोळ खाडीतील भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

अखिल दाभोळ खाडी भोई समाज संघर्ष समितीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर एमआयडीसीकडून ॲक्वा केम या कंपनीला प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याबाबत आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पंचनामा शिर्सीचे सर्कल मदरे यांनी केला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांनीही पाहणी केली आहे. याबाबत लवकरात लवकर कारवाई करून ॲक्वा केम कंपनीचा ठेका रद्द करून एमआयडीसीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात येते आहे.

नष्ट होत आलेल्या माशांची प्रजाती नुकतीच पुन्हा दाभोळखडीत दिसू लागली होती. पण आजच्या या प्रदूषित पाण्यामुळे सर्व जातीचे मासे मृत अवस्थेत आढळत आहेत. याबाबत दाभोळ खाडीतील सर्व मासेमार समाजातून संताप व्यक्त होत आहे.

याबाबत संघर्ष समिती सोमवारी खेड प्रांताधिकारी यांची भेट घेणार आहेत. हे प्रदूषित पाणी त्वरित थांबले नाही तर आम्ही स्वतः पाइपलाइन बंद करू, असा इशारा संघर्ष समिती तर्फे देण्यात आला आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण