शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे येथे कंटेनर पलटी होऊन अपघात; चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 11:39 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे येथे १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क खारेपाटण:

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे येथे आज सकाळी ९.३० वाजता एका अवघड वळणावर आयशर १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी झाला. तर या अपघातात चालक निकलेश कुमार कौल वय - 22 राहणार चुराहाट ,जिल्हा - सिद्धी, मध्यप्रदेश हा किरकोळ जखमी झाला. 

याबाबत अधिक वृत्त असे की गोवा वरुन आलेला  आयशर कंटेनर अवजड वाहन क्र. N L01AD - 8776 हा झेरॉक्स पेपर गठ्ठे १४ टन माल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना आज सकाळी ९.३० वाजता मुंबई गोवा महामार्ग नडगीवे येथे चालक निकलेश कुमार कौल याचा वाहनवरील ताबा सुटून रस्त्याचे दुभाजक क्रॉस करून कंटेनर सुमारे ६० फूट लांब फरफटत जाऊन पलटी झाला.वाहन चालक निकलेश कुमार याच्या उजव्या हाताला व पायाला मार बसला त्याला तातडीने खारेपाटण प्रा. आ केंद्र येथे दाखल करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

अपघाताची माहिती समजताच खारेपाटण पोलिस स्टेशनचे प्रमुख श्री उद्धव साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.यावेळी पोलिस कॉन्स्टेबल पराग मोहिते उपस्थित होते. अपघात एवढा भयंकर होता की या दरम्यान एखादे वाहन समोरून आले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी करीत आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरAccidentअपघात