पाचल : रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने कार उलटून अपघात झाल्याची घटना साेमवारी (१० मार्च) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमाराला राजापूर तालुक्यातील पाचल-अणुस्कुरा मार्गावरील पाचल आठवडा बाजार येथे घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नसून गाडीचे नुकसान झाले आहे. ही कार गाेव्याहून अणुस्कुरा मार्गे बत्तीस शिराळा येथे जात हाेती.कारचालक प्रकाश साेनुले (वय. ४५) हे कार (जीए ०३, एएम ७७३४) घेऊन फिरण्यासाठी निघाले हाेते. गाेव्याहून अणुस्करामार्गे जात असताना खराब रस्त्यामुळे त्यांना एका धाेकादायक वळणावर खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे गाडी उलटून अपघात झाला. यामध्ये चालक साेनुले यांना किरकाेळ दुखापत झाली असून, गाडीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही. या अपघाताची नाेंद पाेलिस स्थानकात करण्यात आलेली नसल्याने अपघाताची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे गाडीत अन्य काेणी प्रवासी हाेते का, हे कळू शकलेले नाही.महिनाभरात तिसरा अपघातपाचल - अणुस्कुरा मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, गेल्या महिनाभरात हा मार्गावरील तिसरा अपघात आहे. वारंवार अपघात हाेऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.
Web Summary : A car overturned near Pachal due to a pothole, injuring the driver. The car, en route from Goa to Battis Shirala, met with the accident on the Pachal-Anuskura road. It's the third accident in a month on the pothole-ridden road.
Web Summary : पाचल के पास गड्ढे के कारण एक कार पलटी, चालक घायल। गोवा से बत्तीस शिराला जा रही कार पाचल-अनुस्कुरा मार्ग पर दुर्घटनाग्रस्त हो गई। एक महीने में गड्ढों वाली सड़क पर यह तीसरी दुर्घटना है।