शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

दोन लिपिक ांवर जिल्ह्याचा गाडा

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

महिला बालकल्याण विभाग : महिला सक्षमीकरण धोरणाचे ‘वाजले की बारा’

रहिम दलाल- रत्नागिरी =जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामध्ये दोन लिपिकांवर जिल्ह्याच्या कामकाजाचा डोलारा चालत आहे़ तसेच जिल्ह्यातील १० पैकी ८ सीडीपीओंचा भार पर्यवेक्षकांवर आहे़ त्यामुळे हा महत्त्वाचा विभाग शासनाकडूनच खिळखिळा केला जात असून, महिला विकासाच्या धोरणाचे तीन-तेरा वाजले आहेत़शासनाकडून महिला सक्षमीकरणाचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जात आहे़ मात्र, प्रत्यक्षात महिलांच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येत आहे़ त्याचे उदाहरण म्हणजे या विभागातील प्रमुख पदासह इतरही महत्त्वाची अनेक पदे रिक्त ठेवलेली आहेत़ त्यामुळे शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचे तीनतेरा वाजले आहेत, असेच म्हणावे लागेल़ महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे, दहावी, बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे, अपंगांना साहित्य पुरविणे, निराधार निराश्रीत विधवा महिलेच्या मुलीच्या विवाहाकरिता अनुदान, स्वयंरोजगार, योजनेखाली महिलांना वैयक्तिक व्यावसायिक आर्थिक सहाय्य योजना यासारख्या विकासत्मक योजना राबविण्यात येत आहेत़ तसेच महत्त्वाची बाब म्हणजे राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानाद्वारे बालकांचे कुपोषण दूर करण्यात येत आहे़ अशा प्रकारे महिला व बालकल्याण विभाग कार्य करीत असताना, या विभागाचे कामकाजाचा डोलारा एक कनिष्ठ लिपिक व एक वरिष्ठ लिपिक यांच्यावर आहे़ त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे़ तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदांवर प्रत्येकी एक अधिकारी कार्यरत आहे़महिला व बालकल्याण या विभागाचे काम मोठे आहे. पण काम करणारे कर्मचारीच कमी असल्याने हा गाडा अक्षरश: नेटाने हाकावा लागत आहे. शासन या विभागातील कर्मचारी भरती केव्हा करणार? असा प्रश्न आता केला जात आहे.गाजावाजा मोठा पण...शासनाकडून दुर्लक्षितया विभागाची महत्त्वाच्या तालुक्यात कार्यभार असणारी सीडीपीओची पदेही भरलेली नाहीत़ सीडीपीओंच्या १२ पदांपैकी मंडणगड व दापोली ही पदे भरलेली असून, उर्वरित १० पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत़ या १० रिक्त पदांचा पदभार या विभागातील पर्यवेक्षक सांभाळत आहेत़ एकीकडे महिला धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाकडून गाजावाजा केला जात असतानाच, महिला व बालकल्याण विभाग शासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे़ उपमुख्यकार्यकारी पदही रिक्तमहिला व बालकल्याण विभागात महत्त्वाचे असे उपमुख्यकार्यकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे़ या पदावर सध्या प्रभारी कार्यरत आहेत़ रिक्त पदांमुळे या विभागाकडे शासन कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़