शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक व्यवहारावरून वाद; साताऱ्यातील फळविक्रेत्याचे रत्नागिरीतून अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:16 IST

निपाणीतील दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : आर्थिक व्यवहाराच्या वादातून साताऱ्यातील फळविक्रेत्या तरुणाचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरीतील टीआरपी परिसरात घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात इम्रान रौफ बागवान (३०, रा. निपाणी) व त्याचा मित्र अनिल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपहरणाचा हा प्रकार साेमवारी (१३ मे) रात्री ११:०० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरानजीकच्या टीआरपी येथील एका हॉटेलसमोरच घडला. याप्रकरणी जहीर शौकत बागवान (३०, रा. पिंपळेश्वर चौक, ता. जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. जहीर बागवान हे फळविक्रेते असून, रत्नागिरीतील अनेक फळ विक्रेत्यांना ते फळे देतात. व्यापाऱ्यांना दिलेल्या मालाचे पैसे घेण्यासाठी ते साेमवारी रत्नागिरीत आले हाेते. निपाणी येथील इम्रान बागवान हेही फळविक्रेते असून, ते जम्मू काश्मीर येथून फळांची खरेदी करून व्यापाऱ्यांना विकतात. त्यांच्याकडून जहीर बागवान यांनीही फळांची खरेदी केली हाेती. त्याचे ६० लाख रुपये ते देणे हाेते.दरम्यान, साेमवारी रात्री ११:०० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास जहीर व त्यांचा मित्र आतिक शेख हे दोघे कारमधून रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे जात होते. यावेळी टीआरपी येथील एका हॉटेलसमोर इम्रान रौफ बागवान याने आपली गाडी थांबविली. त्यानंतर इम्रान व त्याचा मित्र अनिल यांनी जहीर यांना त्यांच्या गाडीत बसवून निपाणी येथे नेले. त्यानंतर जहीर यांना कोंडून घालून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर सोडून देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आपण घाबरल्याने तत्काळ पोलिस स्थानकात तक्रार दिली नाही, असे जहीर बागवान यांनी पाेलिसांना सांगितले. मात्र, त्यांनी शुक्रवारी (१७ मे) रात्री उशिरा रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या अपहरणप्रकरणी पाेलिसांनी अद्याप काेणालाही अटक केलेली नाही. अधिक तपास सहायक पाेलिस निरीक्षक विलास जाधव करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस