रत्नागिरीतील १५ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:47 IST2025-04-29T17:47:34+5:302025-04-29T17:47:56+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे ...

रत्नागिरीतील १५ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर
रत्नागिरी : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह-२०२४ जाहीर झाले आहे. १ मे रोजी या सन्मानचिन्हाने सर्वांना गौरविण्यात येणार आहे.
यामध्ये प्रवर्ग-१० यामध्ये विशेष सेवा करणारे रत्नागिरी पोलिस मुख्यालयातील हवालदार नितीन डोळस यांचा समावेश आहे, तर प्रवर्ग-८ म्हणजे १५ वर्षे सेवा केल्याप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे सहायक पोलिस फौजदार सुधाकर रहाटे, महामार्ग पोलिस मदत केंद्र हातखंबाचे सहायक पोलिस फौजदार संजय मुरकर, देवरुख पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस फौजदार दीपक पवार,
रत्नागिरी शहर पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत, रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेचे हवालदार दिनेश आखाडे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे हवालदार विजय मोरे, पूर्णगड पोलिस स्थानकाचे हवालदार प्रकाश झोरे व महिला हवालदार सोनाली शिंदे, अलोरे पोलिस स्थानकाचे हवालदार दीपक ओतारी, जयगड पाेलिस स्थानकाचे हवालदार मिलिंद कदम, चिपळूण पोलिस स्थानकाचे हवालदार प्रीतेश शिंदे, दापोली पोलिस स्थानकाचे हवालदार संतोष सडकर, पूर्णगड पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस फौजदार महेश सावंत व महेश मुरकर यांचा समावेश आहे.