व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोघांवर गुन्हा दाखल

By अरुण आडिवरेकर | Updated: June 12, 2023 18:55 IST2023-06-12T18:55:19+5:302023-06-12T18:55:35+5:30

रत्नागिरी : शहरातील बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार मागण्यात येणाऱ्या खंडणीमुळे व्यापाऱ्याने कंटाळून ...

Demand for extortion from the trader, A case has been registered against both in the Ratnagiri city police station | व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोघांवर गुन्हा दाखल

व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार मागण्यात येणाऱ्या खंडणीमुळे व्यापाऱ्याने कंटाळून अखेर शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनंतर हुसैन नाजीम हकिम व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी शहरातील बाजारपेठ येथील एका व्यापाऱ्याकडे अनेक वेळा खंडणीची मागणी करण्यात येत हाेती. मार्च २०२० ते १० जून २०२३ या कालावधीत वारंवार मागणी करण्यात आली. बदनामीच्या भीतीने व्यापाऱ्याने १ लाख २१ हजार रुपये दिले. मात्र, त्यांची मागणी वाढतच गेली.

या वाढत्या मागणीला कंटाळून व्यापाऱ्याने रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खंडणीप्रकरणी हुसैन नाजीम हकिम व अन्य एकावर भारतीय दंड विधान कलम ३८४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Demand for extortion from the trader, A case has been registered against both in the Ratnagiri city police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.