शहरं
Join us  
Trending Stories
1
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
2
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
4
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
5
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
6
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
7
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
8
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
9
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
10
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
11
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
12
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
13
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
14
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
15
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
16
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
17
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
18
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
19
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
20
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

होळीसाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, गाडीचे वेळापत्रक.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:54 IST

खेड : शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळूण- पनवेल मेमू स्पेशल साेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ०१०१८ व ०१०१७ क्रमांकाच्या ...

खेड : शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळूण- पनवेल मेमू स्पेशल साेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ०१०१८ व ०१०१७ क्रमांकाच्या चिपळूण- पनवेल मेमू स्पेशलच्या १३ ते १६ मार्चदरम्यान ८ फेऱ्या धावणार आहेत.चिपळूण येथून दुपारी ०३:२५ वाजता सुटणारी मेमू स्पेशल रात्री ०८:३० वाजता पनवेल येथे पोहाेचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून रात्री ०९:१० वाजता सुटून मध्यरात्री २ वाजता चिपळूण येथे पोहाेचेल. या स्पेशल मेमूला आंजणी, खेड, कळंबणी, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापेवामने, वीर, गोरेगाव, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण स्थानकात थांबे देण्यात आले आहेत. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांतील चाकरमान्यांना मेमू स्पेशलमुळे दिलासा मिळाला आहे.

याव्यतिरिक्त मडगाव- पनवेल, मडगाव- एलटीटी या दोन स्पेशलच्या १६ फेऱ्या धावणार असल्याने चाकरमानी सुखावले आहेत. ०११०२/०११०१ क्रमांकाची मडगाव- पनवेल साप्ताहिक स्पेशल १५ व २२ मार्च रोजी धावेल. मडगाव येथून सकाळी ०८:०० वाजता सुटून सायंकाळी ०५:३० वाजता पनवेल येथे पोहाेचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून सायंकाळी ०६:२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०६:४५ वाजता मडगाव येथे पोहाेचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल करमाळी, थिवीम, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण स्थानकांत थांबेल.

तसेच ०११०४/०११०३ क्रमांकाच्या मडगाव- एलटीटी साप्ताहिक स्पेशलच्या ४ फेऱ्या धावणार आहेत. १६ व २३ मार्चला धावणारी स्पेशल मडगाव येथून सायंकाळी ०४:३० वाजता सुटून पहाटे ०६:२५ वाजता एलटीटीला पोहाेचेल. परतीच्या प्रवासात १७ व २४ मार्चला धावणारी स्पेशल एलटीटीहून सकाळी ०८:२० वाजता सुटून रात्री ०९:४० वाजता मडगाव येथे पोहाेचेल. २० एलएचबी डब्यांच्या स्पेशलला करमाळी, थिवीम, सावंतवाडी, कणकवली, विलवडे, कुडाळ, सिंधुदुर्ग, वैभववाडी, राजापूर, आरवली रोड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वेpassengerप्रवासीHoliहोळी 2025