विजेच्या धक्क्याने गुहागरात विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:15 IST2019-03-22T15:14:52+5:302019-03-22T15:15:54+5:30

गुहागर : शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करताना विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ९ ...

Death of student in Guhagar by electric shock | विजेच्या धक्क्याने गुहागरात विद्यार्थ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने गुहागरात विद्यार्थ्याचा मृत्यू

ठळक मुद्देविजेच्या धक्क्याने गुहागरात विद्यार्थ्याचा मृत्यूसांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करताना घडली दुर्घटना

गुहागर : शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करताना विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत घडली.

प्रणव वासुदेव भुवड असे या मुलाचे नाव असून, सृजल प्रकाश गोरे हा दुसरा विद्यार्थी जखमी झाला आहे.
आंबेरे शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी विद्यार्थी करत होते.

प्रणवही त्यात सहभागी झाला होता. स्टेज तयार करण्यासाठीच्या सामानाची नेआण करताना त्याच्या पायाला विजेचा धक्का लागला आणि तो बेशुद्ध पडला. त्याचवेळी सृजल यालाही विजेचा धक्का लागला.

शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी दोघांनाही तत्काळ आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तोपर्यंत प्रणवची प्राणज्योत मालवली होती. सृजलची प्रकृती चांगली आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली होती.

Web Title: Death of student in Guhagar by electric shock