शिवाजी गोरेदापोली : तालुक्यातील हर्णै येथे फिरायला आलेल्या २९ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सुनीलसिंग राजसिंह कुसवाह (सध्या राहा. मांजरी, पुणे, मूळ रा. ताडीवाडा रोड, पुणे) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. ८) दुपारी १२ वाजता घडली असून, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.दापोली तालुक्यात आठ ते दहाजणांचा एक ग्रुप पर्यटनासाठी आला होता. तालुक्यातील हर्णै पाळंदे परिसरात एका रिसॉर्टमध्ये हा ग्रुप थांबला होता. या ग्रुपमधील सुनीलसिंग कुसवाह याला अत्यवस्थ वाटू लागले. त्याला तात्काळ तेथील दोन खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तिथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याबाबत दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.
crime news ratnagiri: पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकाचा दापोलीत मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट
By अरुण आडिवरेकर | Updated: January 9, 2023 18:01 IST