वाकेड येथील अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 14:21 IST2019-03-16T14:19:38+5:302019-03-16T14:21:16+5:30

मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड ता. लांजा) येथील पुलावर शनिवारी सकाळी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याचा सहकारी दोघेही जागीच ठार झाले.

Death of both victims in Wakad accident | वाकेड येथील अपघातात दोघांचा मृत्यू

वाकेड येथील अपघातात दोघांचा मृत्यू

ठळक मुद्देवाकेड येथील अपघातात दोघांचा मृत्यूमहामार्गावर एकेरी वाहतूक

लांजा : मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड ता. लांजा) येथील पुलावर शनिवारी सकाळी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याचा सहकारी दोघेही जागीच ठार झाले.

कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर हा अपघात झाला. दयानंद रमेश शेलार आणि मोहन वसंत शेलार असे या मृतांचे नाव असून ते राजापूरचे रहिवाशी आहेत.

अपघाताचे वृत्त कळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. दरम्यान, महामार्गावर एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे.

Web Title: Death of both victims in Wakad accident