रत्नागिरी: कोंडसरमध्ये आढळला बिबट्याचा मृत बछडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 14:09 IST2022-10-13T14:08:47+5:302022-10-13T14:09:09+5:30

परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर आहे का? असा संशय ग्रामस्थांतून व्यक्त केला जात असून सध्या या परिसरात भीतीचे वातावरण आहे

Dead leopard calf found in Kondsar Ratnagiri | रत्नागिरी: कोंडसरमध्ये आढळला बिबट्याचा मृत बछडा

संग्रहित फोटो

राजापूर : तालुक्यातील कोंडसर बु. गावात संतोष भालचंद्र पांचाळ यांच्या घराच्या परिसरात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

हा बछडा याठिकाणी कसा आला याचे गूढ उकलले नसून अजूनही या परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर आहे का? असा संशय ग्रामस्थांतून व्यक्त केला जात असून सध्या या परिसरात भीतीचे वातावरण आहे. या मृत बिबट्याच्या बछडयाची जागीच विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती राजापूर वनविभागाने दिली.

वनविभागाला या घटनेसंबंधी कळविण्यात आल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली व शवविच्छेदनानंतर त्याचठिकाणी मृत बछड्या बिबट्याचे शरीर जाळून नष्ट करण्यात आले. या बछडा बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे विच्छेदनानंतर स्पष्ट झाले.

परिक्षेत्र वनअधिकारी प्र. ग. सुतार, वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, पोलीस पाटील विजय म्हादये, पशु वैद्यकीय अधिकारी प्रथमेश म्हादये यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Dead leopard calf found in Kondsar Ratnagiri