Ratnagiri: गणेशगुळे समुद्रकिनारी आढळला मृतदेह, पाेलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू
By अरुण आडिवरेकर | Updated: March 6, 2024 17:10 IST2024-03-06T17:00:14+5:302024-03-06T17:10:39+5:30
मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू

Ratnagiri: गणेशगुळे समुद्रकिनारी आढळला मृतदेह, पाेलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील समुद्रकिनारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नेमका काेणाचा आहे, याचा शाेध पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे पोलिस घेत आहेत.
हा प्रकार मंगळवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान समाेर आला. गणेशगुळे येथील समुद्रकिनारी काही ग्रामस्थांना हा मृतदेह पडल्याचे दिसले. त्यांनी याबाबत पोलिस पाटील यांना माहिती देताच त्यांनी पाेलिसांना कळविले. त्यानंतर पूर्णगड सागरी पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
या मृतदेहाची ओळख पटलेली नसून, हा मृतदेह पुरुषाचा आहे. त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पाेलिसांनी सुरू केले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद केली आहे.