शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बंद दवाखान्यांमुळे दापोलीत प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू

By admin | Updated: October 5, 2014 23:05 IST

तिन्ही दवाखानेही बंद असल्याचे कळले

दापोली : निवडणुकीचे प्रशिक्षण घेत असताना छातीत दुखू लागल्याने प्रशिक्षण अर्धवट सोडून निघालेल्या एका प्राथमिक शिक्षकाचा दापोलीतील सर्व दवाखाने बंद असल्यामुळे उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. अशोक गोटे (मूळ नगर, सध्या रुपनगर, दापोली) हे कुडावळे शाळा नं. १ भोईटवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सकाळी रसिकरंजन सभागृहात या शिक्षकाचे निवडणूक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. गोटे यांच्या सकाळपासूनच छातीत दुखत होते. मात्र, त्यांनी आजाराकडे दुर्लक्ष करीत प्रशिक्षण केंद्र गाठले.प्रशिक्षण सुरु असताना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत पुन्हा दुखू लागले. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अन्य एका प्राथमिक शिक्षकाला जोडीला घेऊन ते निघाले. दापोलीत हृदयविकार तज्ज्ञांचे दोन दवाखाने बंद होते. त्यामुळे ते दोघे तिसऱ्या दवाखान्यात आले. त्यावेळी डॉक्टर घरी असतानाही ते नसल्याचे सांगण्यात आले. तिन्ही दवाखानेही बंद असल्याचे कळले आणि त्याच ठिकाणी गोटे हे खाली कोसळले. मात्र, थोड्याच वेळात या दवाखान्यातील डॉक्टर त्या ठिकाणी हजर झाले व त्यांनी गोटे यांना मृत घोषित केले. उपचाराअभावी झालेल्या शिक्षकाच्या या मृत्यूमुळे दापोलीवर शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी)