शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पिकाचे नुकसान

By admin | Updated: September 30, 2014 00:14 IST

शेतकरी चिंतातूर : हळवे भातपीक धोक्यात येण्याची चिन्हे

कुवे : नवरात्रोत्सवात सतत पडणाऱ्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. ओल्या दुष्काळाचीही शक्यता आहे.बहुतांश शेतकरी ९० दिवसांमध्ये तयार होणारे हळवे बियाणे वापरतात. हळवी भातशेती सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तयार होते. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केल्याने भातपीक आॅक्टोबर महिन्यात कापणीला योग्य होईल, असा अंदाज शेतकरीवर्गाने वर्तवला आहे. मात्र, या नवरात्रोत्सवात सतत पडणाऱ्या पावसामुळे तयार भातपीक आडवे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.कुवे परिसरातील भातशेतीवर कीड, तर काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने भातशेती पूर्णपणे आडवी होत आहे. बहुतांश ठिकाणी कीड आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.पावसाप्रमाणे वन्य प्राण्यांकडूनही भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. रानटी प्राणी भाताच्या लोंबी तोंडत असल्याने जनावरांच्या उपद्रवामध्ये भातपिकाचे संरक्षण करणे शेतकरीवर्गाला अवघड झाले आहे.सतत पडणाऱ्या या पावसामुळे आता यावर्षी भात कापणीचा हंगाम लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भातपीक तयार झाले असून, आणखी १५ ते २० दिवसांनी कापणीला सुरुवात होणार आहे. मात्र, पावसाच्या या रोजच्या हजेरीमुळे हा हंगाम दिवाळीपर्यंत लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भात कापणीचा हंगाम सुरू होत असल्याने व मध्ये पडणाऱ्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात वादळी पावसाने काही कालावधी थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे प्रमाण वाढले आहे. भातशेतीच्या हळव्या पिकावर पावसाचे सावट असून हे पिक हातचे जाईल याबाबत शेतकरी साशंक असून सततच्या पावसामुळे लांजा, देवरूख, राजापूर, दापोली, खेड या भागातील भातशेती धोक्यात ्आली ्आहे. याबाबत तज्ञानी भिती व्यक्त केली जात आहे. कोकणात यंदा पावसाची सरासरी ओलांडली असून उरलेल्या कालावधीत अजून पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या हातचे पिक जाणार आहे. पावसाच्या संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निवडणूक काळानंतर काय करता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)सतत पडणाऱ्या पावसामुळे ओल्या दुष्काळाची नांदी.पावसामुळे भातपीक आडवे होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.उकाडा वाढला.नवरात्रोत्सवात पावसाची हजेरी कायम.भातशेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान.भातशेतीचा कापणीचा हंगाम लांबणार.कोकणात यंदा पावसाची सरासरी पूर्ण झाली. हा पाऊस दसऱ्याला पूर्ण थांबतो. यंदा नवरात्रात सायंकाळी पाऊस पडत असल्याने दांडियाप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच हळव्या शेतीचे नुकसान होत आहे. लांजा तालुक्यात भातशेतीला फटका बसत आहे.