video चिपळुणात मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:27 IST2022-06-28T13:26:16+5:302022-06-28T13:27:06+5:30

आतातपर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहचलेला नाही. परंतु मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Crocodile free movement on the road in Chiplun | video चिपळुणात मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल

video चिपळुणात मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल

चिपळूण : गेल्या काही दिवसांत शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचा वावर वाढला आहे.  अशातच गोवळकोट रोड येथील 'मगर पॉईंट'च्या ठिकाणी देखील मगरींची संख्या वाढली आहे. या भागात मगरी रात्रीच्या वेळी चक्क रस्त्यावरच मुक्तसंचार करताना दिसतात. काल, सोमवारी रात्री काही नागरिक गोवळकोट रस्त्याने जात असताना त्यांनी रस्त्यावर आलेल्या मगरीचे चित्रण केले. गोवळकोट चर येथे एकाच ठिकाणी मगरींची संख्या अधिक आहे.

शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचे प्रमाण वाढले आहे. अगदी रहदारी असलेल्या बाजारपूल व शिवनदी पुलानजीक भल्या मोठ्या मगरींचे दर्शन नेहमी होते. त्यातच आता मगरींच्या पिल्लांचे प्रमाणही वाढले आहे. या दोन्ही नद्यांमध्ये जागोजागी मगरी दिसू लागल्या आहेत. आतातपर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहचलेला नाही. परंतु मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शहरातील गोवळकोट चर येथे कायम मगरी असतात. साधारण तीन फुटापासून दहा फूट लांबीच्या मगरी येथे आहेत. रस्त्यावरून येता-जाता येथे मगरी दिसतात. हे ठिकाण 'मगर पॉईंट'म्हणून पर्यटकांमध्ये परिचित आहे. या ठिकाणच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र निधी अभावी  हे काम रखडले. आता या तलावातील मगरी रात्रीच्या वेळी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या तलावाभोवती संरक्षक भिंत उभारण्याची मागणी होत आहे.

Web Title: Crocodile free movement on the road in Chiplun