CoronaVirus Lockdown : अखेर तळीरामांची प्रतीक्षा संपली, रत्नागिरीतील वाईन शॉपी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:13 IST2020-05-15T17:12:35+5:302020-05-15T17:13:33+5:30
आज सुरू होईल, उद्या सुरू होईल अशा आशेवर असणाऱ्या मद्यप्रेमींना शुक्रवारी दिलासा मिळाला. लॉकडाऊनपासून बंद असलेली वाईन शॉप अखेर शुक्रवारपासून खुली झाली. तब्बल ५६ दिवस दारूची दुकाने बंद होती. शुक्रवारी मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांबाहेर रांग लावली होती. सोशल डिस्टन्स पाळत आणि सर्व नियमांची अंमलबजावणी करत अनेकांनी दारू खरेदी केली.

CoronaVirus Lockdown : अखेर तळीरामांची प्रतीक्षा संपली, रत्नागिरीतील वाईन शॉपी सुरु
रत्नागिरी : आज सुरू होईल, उद्या सुरू होईल अशा आशेवर असणाऱ्या मद्यप्रेमींना शुक्रवारी दिलासा मिळाला. लॉकडाऊनपासून बंद असलेली वाईन शॉप अखेर शुक्रवारपासून खुली झाली. तब्बल ५६ दिवस दारूची दुकाने बंद होती. शुक्रवारी मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांबाहेर रांग लावली होती. सोशल डिस्टन्स पाळत आणि सर्व नियमांची अंमलबजावणी करत अनेकांनी दारू खरेदी केली.
लॉकडाऊनच्या काळात तब्बल ५६ दिवसांपेक्षा अधिक काळ मद्याची दुकाने बंद राहिली. या कालावधीत राज्य शासनाने मद्याची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. परंतु, अनेक जिल्ह्यात दारू दुकानांवर मोठी गर्दी झाली.
यामुळे जिल्ह्यात अद्यापर्यंत दुकाने उघडली नव्हती. त्यानंतर ऑनलाईन मद्यविक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु, अवघ्या काही तासात हा निर्णय मागे घेण्यात आला होता. ऑनलाईन विक्रीचा निर्णय मागे घेत दुकानांमध्येच मद्य विक्रीची मुभा देण्यात आली.
मात्र, शहरात मद्यविक्री दुकाने उघडण्यात अडचणी आल्या. ग्रामीण भागातील दुकाने मात्र सुरू झाले. परंतु शहरातील दुकाने शुक्रवारपासून सुरू झाली. ऑनलाईन आणि थेट दुकानांत मद्य विक्री सुरू झाली. मद्यपींनी देखील मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच दुकानांबाहेर रांग लावली. सोशल डिस्टन्स पाळत अनेकांनी दारू खरेदी केली.
काहींनी दुकानाबाहेर सॅनिटायझर घेऊन कर्मचाऱ्याला उभे ठेवले होते. दुकानात येणाऱ्या ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर देऊनच दुकानात पाठवले जात होते. तर काहींनी केवळ एकच ग्राहक दुकानात येईल अशी व्यवस्था केली होती.