शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

coronavirus: रत्नागिरीत कोरोनाचा रूग्ण, अहवाल पॉझिटीव्ह येताच प्रशासकीय यंत्रणेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 22:21 IST

संबंधित रूग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील आहे. ते दुबईमध्ये काम करतात. कोरोनाच्या प्रकारामुळे ते दुबईहून परत आले.

रत्नागिरी : दुबईहून आलेल्या एका प्रौढाला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता या रूग्णाचा अहवाल रत्नागिरीत थडकला आणि आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. हा रूग्ण मंगळवारी जिल्हा रूग्णालयात दाखल झाला होता. तो कोरोनाग्रस्त असल्याची अधिकृत माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. त्यांच्यासोबत आणखी दोघेजण दुबईहून आले होते. आता त्यांच्यावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हा राज्यरातील ४५ वा रूग्ण आहे.

संबंधित रूग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील आहे. ते दुबईमध्ये काम करतात. कोरोनाच्या प्रकारामुळे ते दुबईहून परत आले. दुबईहून आलेल्या या प्रौढाची विमानतळावर तपासणी झाली. मात्र तो कोरोनाग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला. तेथून ते शृंगारतळी येथे आले. मंगळवारी त्यांना ताप येऊ लागल्याने ते एका खासगी दवाखान्यात गेले. ते दुबईहून आले असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या डॉक्टरनी त्यांना दुसºया डॉक्टरांकडे पाठवले. त्यांनाही ही माहिती लक्षात आल्यानंतर त्यांनी या रूग्णाला गुहागर ग्रामीण रूग्णालयाकडे पाठवले. तेथून १0८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने त्यांना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. जिल्हा रूग्णालयाकडून लगेचच त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले. बुधवारी रात्री या तपासणीचा अहवाल जाहीर करण्यात आला असून, संबंधित रूग्णाला कोरोना झाला असल्याचा अंतिम निष्कषै काढण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांची बैठकपुणे येथून अहवाल येताच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा शल्य चिकत्सिक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर तसेच काही महत्त्वाच्या अधिकाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर डॉ. बोल्डे यांनी संबंधित रूग्णाला कोरोना झाला असल्याची अधिकृत माहिती दिली.

आणखी दोघांवर लक्ष?संबंधित रूग्णासोबत आणखी दोघेजण दुबईहून आले आहेत. मात्र ते कोठेही तपासणीसाठी पुढे आलेले नाहीत. आता या रूग्णाला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यासोबत आलेल्या दोघांकडे आरोग्य यंत्रणेने आपला मोर्चा वळवला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे