Corona in ratnagiri: An automatic sanitizer dome at the district hospital | Corona in ratnagiri : जिल्हा रूग्णालयात स्वयंचलित सॅनिटायझर डोम

Corona in ratnagiri : जिल्हा रूग्णालयात स्वयंचलित सॅनिटायझर डोम

ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयात स्वयंचलित सॅनिटायझर डोमनिर्जंतुकीकरण सुविधा, स्वॅबसाठीही संपर्कमुक्त कक्षाची निर्मिती

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सॅनिटायझर डोम आणि संपर्क मुक्त स्वॅब नमुना गोळा करणाऱ्या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सींग अतिशय महत्वाचे आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच येथील डॉक्टर नर्सेस आणि इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी निर्जंतुकीकरण महत्वाचे आहे.

हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ह्यसॅनिटायझर डोमह्ण उभारण्यात आला आहे.

या स्वयंचलित डोमला सेन्सर बसवण्यात आलेले आहेत. यात येणारी व्यक्ती दाखल होताच निर्जंतुकीकरण द्रावणाचा फवारा सुरू होतो, तो या दोन मीटरच्या कक्षातून बाहेर पडेपर्यंत सुरू राहतो, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे निर्जंतुकीकरण शक्य होत आहे, अशी माहिती हेल्पिंग हँड्सचे कार्यकर्ते संजय वैशंपायन यांनी दिली.

निर्जंतुकीकरणासाठी साबणयुक्त पाणी पुरेसे आहे. त्याचा या डोमला अविरत पुरवठा होईल, याची पुर्णपणे खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.

यासोबतच संशयित रुग्णांच्या घशाचा द्राव (स्वॅब) तपासणीसाठी ज्या ठिकाणी घेतला जातो, त्या ठिकाणी एका काचेच्या बंदिस्त केबिनबाहेर रबरी ग्लोव्हजच्या आधारे तपासणी नमुना गोळा करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या ठिकाणी नमुना घेतल्यानंतर लगेच जंतुनाशक फवारणी करण्यात येते. आतील बाजूस नमुना गोळा करणाऱ्या डॉक्टरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्याच्या काचा सिलिकॉने बंदिस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात.

 

Web Title: Corona in ratnagiri: An automatic sanitizer dome at the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.