मुंबई-गोवा महामार्गावर गाडगीळ वाडी येथे कंटेनर उलटला; एक ठार, सहाजण जखमी
By मनोज मुळ्ये | Updated: June 5, 2024 19:04 IST2024-06-05T19:03:17+5:302024-06-05T19:04:07+5:30
विनोद पवार राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गाडगीळ वाडी येथे कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटून भीषण अपघात झाला. या ...

मुंबई-गोवा महामार्गावर गाडगीळ वाडी येथे कंटेनर उलटला; एक ठार, सहाजण जखमी
विनोद पवार
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गाडगीळ वाडी येथे कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरमधील पसरलेल्या कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजाराम चव्हाण हे घटनास्थळी तपास करीत आहेत.
भरधाव वेगाने आलेल्या या कंटेनरने कंटेनर क्रमांक (RJ-09-GC-5286) येथील निवारा शेड जवळ गाडीची वाट पाहत असणाऱ्या काही प्रवाशानांही दुखापत झाली. तर दोन मोटारसायकलसह एका कारला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की महामार्गालगत लावण्यात आलेल्या संरक्षक लोखंडी बार कारमध्ये घुसला.
कंटेनरमधील कोळसा रस्त्यावर सर्वत्र पसरला असुन या ढिगाऱ्याखाली अन्य प्रवासी अडकल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाने एका क्रेनला पाचारण केले आहे. यानंतरच कोळशाच्या ढिगाऱ्याखाली कोण अडकले आहे की नाही याची खातरजमा होणार आहे.