मुंबई-गोवा महामार्गावर धामणी येथे कंटेनर-डंपरचा अपघात, तिघे जखमी; एकाची प्रकृती गंभीर
By मनोज मुळ्ये | Updated: January 2, 2024 16:48 IST2024-01-02T16:43:12+5:302024-01-02T16:48:07+5:30
देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावरील संगनेश्वरनजीक धामणी येथे कंटेनर आणि डंपर यांच्या मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघेजण ...

मुंबई-गोवा महामार्गावर धामणी येथे कंटेनर-डंपरचा अपघात, तिघे जखमी; एकाची प्रकृती गंभीर
देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावरील संगनेश्वरनजीक धामणी येथे कंटेनर आणि डंपर यांच्या मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. महंमद अजमुद्दिन अन्सारी असे गंभीर जखमी झाल्याचे नाव असून, सोलू सखाराम गौतम आणि महम्मद याकूब हे किरकोळ जखमी झाले आहेत.
सोनू सखाराम गौतम हा कंटेनर घेऊन मुंबईहून गोव्याकडे जात होता. तसेच डंपर चालक महंमद अन्सारी हा धामणीकडे खडी घेऊन जात हाेता. धामणीदरम्यान कंटेनर आणि डंपर यांच्यात अपघात झाला. या अपघातानंतर डंपर रस्त्याच्या बाजूला खोल दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमींना तात्काळ संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती कळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संगमेश्वर पाेलिस स्थानकाचे चंद्रकांत कांबळे, सतीश कोलगे, विनय मनवल, सिद्धेश आंब्रे, रोहित पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा केला. या अपघाताची नाेंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु हाेते.