शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लांजातील अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाला राजस्थानातून अटक

By अरुण आडिवरेकर | Updated: June 28, 2023 11:34 IST

मद्यधुंद अवस्थेत दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले होते

लांजा : अपघातानंतरन्यायालयात तारखांना हजर राहत नसल्याने लांजा न्यायालयाने काढलेल्या अटक वाॅरंटनंतर लांजा पोलिसांनी कंटेनर चालकाला राजस्थानातील अजमेर येथून अटक केली. त्याला लांजा न्यायालयासमोर हजर केले असता पंधरा दिवसांचा साधा कारावास आणि सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा अपघात हा २०१४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ (ता. लांजा) येथे झाला होता. कंटेनर चालक किसन लाल सिंग (५०, रा. अजमेर राज्य राजस्थान) असे चालकाचे नाव आहे. तो कंटेनर (एमआर ६१, बी ३४५५) घेऊन गोवा ते अहमदाबाद असा चालला होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने समोरून येणाऱ्या मॅजिक गाडी (एमएच ०४, इएक्स २९२०) या गाडीला धडक दिली होती. या धडकेत मॅजिक गाडीतील प्रमोदिनी प्रमोद अडूरकर (४०) आणि दुर्वास प्रमोद आडुळकर (१२, दोघे रा. पालशेत, गुहागर) यांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण जखमी झाले होते. या प्रकरणी कंटेनर चालक किसन लालसिंग याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर या अपघात प्रकरणी लांजा न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र, न्यायालयात तारखेला लालसिंग हा वारंवार गैरजर राहत होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वाॅरंट काढला होता. यानुसार पोलिस निरीक्षक दादासाहेब गुड्डूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप साळुंखे, कॉन्स्टेबल गिरी गोसावी व हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे यांनी संबंधित कंटेनर चालकाची माहिती घेऊन राजस्थान अजमेर येथे जाऊन त्याला अटक केली. त्यानंतर सोमवारी (२६ जून) सायंकाळी सर्वजण लांजा येथे दाखल झाले. मंगळवारी (२७ जून) किसन लाल सिंग याला लांजा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांचा साधा कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातPoliceपोलिसCourtन्यायालय