चिपळुणात धर्मराज्य पक्षाची रंगरंगोटी

By Admin | Updated: June 13, 2016 00:11 IST2016-06-12T23:19:49+5:302016-06-13T00:11:11+5:30

धर्मराज्य पक्षाध्यक्ष राजन राजे इतकेच नाव या मजकुराच्या खाली लिहून जनमानसाच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

The color of the party of the party of Chiplun | चिपळुणात धर्मराज्य पक्षाची रंगरंगोटी

चिपळुणात धर्मराज्य पक्षाची रंगरंगोटी

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील पूर्व विभागातील विविध गावांसह थेट कुंभार्ली घाट मार्गावरही धर्मराज्य पक्षाची विचारधारा स्पष्ट करणारे मजकूर लिहिले जात आहेत. या मजकुरातून धर्मराज्य पक्षाची मोर्चेबांधणी करण्याचे काम सुरू बसल्याचे दिसत आहे.
धर्मराज्य पक्षाध्यक्ष राजन राजे इतकेच नाव या मजकुराच्या खाली लिहून जनमानसाच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येत आहे. मुंबई-ठाणे येथील पक्ष कार्यकर्ते मूळचे चिपळूण तालुक्यातील असल्याने स्वतंत्र गाडीसह अनेक मोऱ्यांचे कठडे, घाटातील काळ्याकुट्ट दगडांवर या पक्षाची जाहिरात केली जात आहे. भारतातील पहिला पर्यावरणवादी पक्ष, किमान वेतन २५ हजार कामगाराला न देणाऱ्या उद्योजकाला शिक्षा अशा लक्षवेधी ओळी वाचून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. तथापि, उघडपणे एकही बैठक न झाल्याने या पक्षांशी संलग्न स्थानिक व्यक्ती कोण? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: The color of the party of the party of Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.