शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण-कराड मार्ग ६० दिवस बंद; कोणत्या मार्गे वळवण्यात आली वाहतूक...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:02 IST

धांडे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी धोरणात्मक निर्णय

चिपळूण : चिपळूण-कराड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील धांडे पुलाची पुनर्बांधणी तसेच बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शुक्रवारी २७ मार्च रात्री १२ वाजल्यापासून ६० दिवस हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार २७ मार्च रोजी रात्री १२ पासून ते २७ मे रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल लागू राहणार आहे. यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून कराड व उंब्रज बाजूकडून चिपळूणकडे येणारी अवजड वाहतूक ही कराड-उंब्रज येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ मार्गे पाचवड फाटा-उंडाळे-कोकरुड-मलकापूर-आंबा घाट-संगमेश्वर मार्गे चिपळूणकडे वळविण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना बुधवारी जारी झाली आहे. चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे जाणाऱ्या अवजड वाहतूक चिपळूण -संगमेश्वर-आंबा घाट-मलकापूर-कोकरुड- उंडाळे-पाचवड फाटा-राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ मार्गे कराड व उंब्रजकडे जाणार आहे.कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी सर्व हलकी वाहतूक ही कराड-उंब्रज येथून नवा रस्ता-गव्हाणवाडी फाटा-नेरळे गौंडमार्गे कराड-चिपळूण महामार्गावरून पुढे चिपळूणकडे जाणार आहे. तसेच चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे जाणारी सर्व हलकी वाहतूक ही चिपळूण-नेरळे गौंड-गव्हाणवाडी फाटा-नवा रस्ता मार्गे कराड व उंब्रजकडे वळवण्यात येणार आहे.धांडे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तसेच बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यक ते दिशादर्शक फलकही लावण्यात आले असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : चिपळूण-कराड मार्ग ६० दिवसांसाठी बंद: वाहतूक वळवण्याची घोषणा

Web Summary : पुलाच्या पुनर्बांधणी आणि रस्त्याच्या कामामुळे चिपळूण-कराड महामार्ग २७ मार्चपासून ६० दिवसांसाठी बंद. अवजड वाहनांना चिपळूण-संगमेश्वर-आंबा घाट मार्गे वळवण्यात आले आहे. हलकी वाहने नेरळे-गौंड-गव्हाणवाडी मार्गे जातील. पोलिसांनी सहकार्याचे आवाहन केले आहे.