Ratnagiri: मुरूड समुद्रकिनारी पुन्हा सापडला चरस, दापोली पोलिसांकडून शोध मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:07 PM2023-08-18T12:07:37+5:302023-08-18T12:18:45+5:30

पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच ठेवणार

Charas recovered from Murud beach, search operation by Dapoli police in Ratnagiri | Ratnagiri: मुरूड समुद्रकिनारी पुन्हा सापडला चरस, दापोली पोलिसांकडून शोध मोहीम 

Ratnagiri: मुरूड समुद्रकिनारी पुन्हा सापडला चरस, दापोली पोलिसांकडून शोध मोहीम 

googlenewsNext

दापोली : तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी चरसची पाकिटे सापडल्यानंतर या भागात पाेलिसांकडून शाेध माेहीम सुरू करण्यात आली आहे. या शाेध माेहिमेत गुरुवारी (१७ ऑगस्ट) मुरूड येथे आणखी ८ अफगाणी चरसची पाकिटे सापडली आहेत. 

आज, शुक्रवारी आघारी येथे आणखी ४ पॅकेट चरस आढळले. सलग चार दिवस दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर चरसचे पॉकेट आढळून येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील केतकीच्या बनात सोमवारी (१४ ऑगस्ट) चरसची १२ पाकिटे सापडली हाेती. ही पाकिटे गुजरात येथे पकडण्यात आलेल्या चरसच्या पाकिटांशी मिळती जुळती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर बुधवारी (१६ ऑगस्ट) हर्णै नवानगर येथे समुद्रकिनारी ८ पाकिटे सापडली हाेती. ही पाकिटे पाेलिसांनी जप्त केली आहेत. 

त्यानंतर दापोली हर्णै दूरक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक बी. डी. पवार, हर्णै दूरक्षेत्राचे दिलीप नवले यांनी हर्णै ते मुरूड दरम्यान शाेध मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. हर्णै नवानगर, मुरुड, कर्दे या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मुरूड किनारी पुन्हा आठ चरसची पाकिटे सापडली आहेत. त्याचा पंचनामा करून ती जप्त करण्यात आली आहेत. पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड समुद्रकिनारी शोध मोहीम राबवली जात आहे. समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आल्यास पोलिसांना खबर देण्याचे आवाहन दापोली पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी केले आहे

Web Title: Charas recovered from Murud beach, search operation by Dapoli police in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.