शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, बागायतदार धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:33 IST

रत्नागिरी : गेल्या आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा वाढू लागला ...

रत्नागिरी : गेल्या आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा वाढू लागला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पाऊस कुठल्याही क्षणी पडण्याची शक्यता वाटत होती. ढगाळ वातारणामुळे तयार होऊ लागलेल्या हापूसवर तुडतुडे पडण्याच्या शक्यतेने बागायतदार धास्तावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात १ आणि २ एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागले आहेत. मार्चपूर्वीच तापमानाचा पारा पहिल्यांदाच ३९ अंश सेल्सिअसवर गेला होता. त्यानंतर पुन्हा सकाळी आणि रात्री गारवा तर मध्येच मळभ आणि अधूनमधून पावसाचा शिडकावा असे वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे या वातावरणामुळे सर्दी, ताप, घशाचे संसर्ग, पित्त आदी आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून पुन्हा किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कर्नाटकाच्या किनाऱ्यावर चक्री वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर होत असून काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरीतही सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल की काय, असे वाटत होते. सायंकाळी मेघगर्जनाही होत होती. १ आणि २ एप्रिल रोजी जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून आठवडाभर वातावरणही ढगाळ राहणार आहे. त्यामुळे उकाड्यातही कमालीची वाढ झाली आहे.दरम्यान, हापूसला सुरुवातीपासूनच या बदलत्या वातावरणाचा फटका बसू लागला आहे. फळ तयार झाल्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे हापूस भाजला असून काही ठिकाणी काळे डागही पडले आहेत. त्यातच आता ढगाळ वातावरणामुळे थ्रीप्स, तुडतुडा, फळमाशीचे संकट हापूससमोर असल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वाऱ्याचा जोरही वाढल्याने आंबापिकाची गळही होत आहे. त्यामुळे या नैसर्गिक बदलाने बागायतदार हवालदिल झाले आहेत.

वाऱ्याचा जोर असल्याने मच्छीमारीही अडचणीत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मच्छीमारांसमोर संकट उभे आहे. एकंदरीत, तापमानाचा वाढता आलेख, मळभाचे वातावरण आणि पावसाचे संकट यामुळे आरोग्य, हापूस, मच्छीमारी धोक्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामान अंदाजRainपाऊसFarmerशेतकरीMangoआंबा