शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांच्या आले नाकीनऊ, दाखवली जातायत आमिषे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:48 IST

Local Body Election: सर्वच राजकीय पक्षांना इच्छुकांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता

रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिले असले, तरी अजून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने कोणाला उमेदवारी द्यावी? असा प्रश्न अजूनही पक्ष नेतृत्वाला सतावत आहे. त्यामुळे इच्छुकांची समजूत काढताना नेतृत्वाच्या नाकीनऊ आले आहेत.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. सुमारे साडेतीन वर्षे रखडलेली निवडणूक होत असल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार आपले राजकीय भवितव्य बनवण्यासाठी आपल्यालाच कशी उमेदवारी मिळेल, यादृष्टीने आपली ताकद लावत आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. आता अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस बाकी असले, तरीही अजून राजकीय पक्षांचे उमेदवार ठरलेले नाहीत.इच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत. काही राजकीय पक्षांकडून इच्छुकांना कागदपत्रे तयार करून त्यांचे उमेदवारी अर्जही भरून घेतले जात आहेत. एका प्रभागामध्ये दोन जागा असून, इच्छुक अनेक, अशी स्थिती आहे. अशा इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना इच्छुकांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसत आहे.

इच्छुकांना आमिषेउमेदवारी मिळणार नसलेल्या इच्छुकांना राजकीय पक्षाकडून वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत. कोणाला धनाचे तर कोणाला स्वीकृत नगरसेवक पदाचेही आमिष दिले जात आहे. तरीही अनेक इच्छुक तयार होत नसल्याने नेेतेमंडळींच्या नेतृत्वाचा कस लागला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Local Election: Leaders face tough time pacifying aspirants with promises.

Web Summary : Ratnagiri municipal elections see intense competition. Leaders struggle to finalize candidates amidst numerous aspirants. Many are being lured with promises of wealth or council seats to avoid rebellion. The deadline is near, and political heat is rising.