शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:32 IST

खेड : तालुक्यातील बोरघर घोलपवाडी येथील वृद्धाला तिघांनी पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याची घटना शनिवारी, दि. ८ रोजी सकाळी ७़ ३० ...

खेड : तालुक्यातील बोरघर घोलपवाडी येथील वृद्धाला तिघांनी पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याची घटना शनिवारी, दि. ८ रोजी सकाळी ७़ ३० वाजण्याच्या सुमाराला घडली़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्धावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

लक्ष्मण विठोबा घोलप (वय ६६, रा. घोलपवाडी, मु. बोरघर) हे त्यांच्या पत्नी सुनीता घोलप, मुलगा नवनाथ घोलप, सून नेहा नवनाथ घोलप व दोन नातवंडं असे एकत्र राहतात. दि. ८ रोजी सकाळी ७़ ३० वा. सुमारास घरासमोरील कुलदैवत मंदिराच्यासमोर घरगुती सत्यनारायणाची पूजा असल्याने लक्ष्मण घोलप मकर तयार करत होते. त्यांचा नातू गौरव अनिल शिंदे (१३) हा लोखंडी कोयतीने नारळ फोडत होता. त्यांची पत्नी व सून यांनी मंदिरासमोरील जागा शेणाने सारवली होती. त्या मंदिराच्या शेजारी लक्ष्मण घोलप यांचे दोन सख्ख्ये भाऊ प्रकाश विठोबा घोलप (वय ६०) व दीपक विठोबा घोलप (५५, दोघे रा. घोलपवाडी, मु. बोरघर) हाेते़ दीपक घोलप यांच्या कोंबड्या पूजेच्या ठिकाणी सारवलेली जागा उकरत असल्याचे पाहून लक्ष्मण घोलप यांनी समजावून सांगितले़ या गोष्टीचा मनात राग धरून दीपक याने लक्ष्मण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी लहान भावजय दीपिका दीपक घोलप व भाऊ प्रकाश घोलप हे तेथे आले़ त्या तिघांनी लक्ष्मण घोलप यांना शिवीगाळ केली, तर दीपक याने लक्ष्मण यांना मारहाण केली़ दीपिका हिने त्यांचे दोन्ही हात पकडले व दीपक याने त्यांच्या डाव्या डोळ्यावर ठोशा मारला़ भाऊ प्रकाश याने लोखंडी कोयता डोक्यावर मारला. त्यात लक्ष्मण घोलप गंभीर जखमी झाले. त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या घटनेची माहिती लक्ष्मण घोलप यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दीपक विठोबा घोलप (५५), दीपिका दीपक घोलप व प्रकाश विठोबा घोलप (६०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़