Accident in Ratnagiri: कारची-ट्रकला भीषण धडक, सुदैवाने जीवितहानी टळली; निवळी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:36 IST2022-05-02T13:35:13+5:302022-05-02T13:36:08+5:30

या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

Car-truck collision, car driver injured, Incident at Nivli ratnagiri district | Accident in Ratnagiri: कारची-ट्रकला भीषण धडक, सुदैवाने जीवितहानी टळली; निवळी येथील घटना

Accident in Ratnagiri: कारची-ट्रकला भीषण धडक, सुदैवाने जीवितहानी टळली; निवळी येथील घटना

रत्नागिरी : कारने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालक जखमी झाला आहे. हा अपघात आज, सोमवारी सकाळच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील निवळीनजीक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरीतून जयगडच्या दिशेने ट्रक (एमएच ०९, एल ६६०४) साखर भरुन जात होता. निवळीनजीक हा ट्रक आला असता रत्नागिरीकडे येणाऱ्या कारने (एमएच ०४, टीजे २७१७) ट्रकला जोराची धडक दिली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. तर, कार चालक जखमी झाला.

या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत केली. पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे व महेंद्र खापरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Web Title: Car-truck collision, car driver injured, Incident at Nivli ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.