आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 05:28 PM2022-01-11T17:28:47+5:302022-01-11T18:16:24+5:30

कधी शेतात नांगरणी करताना तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना तर ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचताना दिसणारे आमदार भास्कर जाधव चक्क बस चालवितानाच चिपळूणकरांना दिसले.

The bus was driven by MLA Bhaskar Jadhav | आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले..

आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले..

Next

चिपळूण : कधी शेतात नांगरणी करताना तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना तर ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचताना दिसणारे आमदार भास्कर जाधव चक्क बस चालवितानाच चिपळूणकरांना दिसले. भास्कर जाधव यांना बस चालविताना पाहून सारेच अवाक् झाले.

चिपळूण महामार्गावरील एका कार्यालयातून एक नवी काेरी बस बाहेर पडली. रस्त्यावरुन चालणारी ही बस पाहून साऱ्यांनाच कुतूहल वाटले. अनेकजण नव्या काेऱ्या बसकडे पाहत असतानाच या बसच्या चालकाच्या जागी बसलेल्या व्यक्तीला पाहून अनेकांना धक्काच बसला. या चालकाच्या जागेवर चक्क चिपळूणचे आमदार भास्कर जाधव बसले हाेते आणि ते स्वत: ही बसच चालवत हाेते. हे सारे पाहिल्यानंतर सारेच अवाक् झाले. भास्कररावांनी अचानक बस का चालवली, असा प्रश्न अनेकांना पडला.



त्यानंतर या बस चालवण्यामागील किस्सा सर्वांसमाेर आला. भास्कर जाधव यांच्या लाेटेतील एका कार्यकर्त्याने व्यवसायासाठी ही बस आणली हाेती. बस घेऊन ताे मित्र थेट भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ आला. भास्कर जाधव यांनी श्रीफळ वाढविले आणि गाडीला हार घातला.

पण ते एवढ्यावरच न थांबता गाडीत चढले, त्यांनी गाडीचे स्टेअरिंग हाती धरले आणि गिअर टाकून गाडी रस्त्यावर आणली. चिपळुणातून फेरफटका मारुन ते पुन्हा कार्यालयाजवळ आले. अत्यंत सफाईदारपणे गाडी चालविताना पाहून अनेकांनी तर ‘शेठ, तुमचे ड्रायव्हिंगही आहे ग्रेट’, अशी उपमाही देऊन टाकली.

Web Title: The bus was driven by MLA Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.