दापोलीत बोट बुडाली, ६ पैकी ४ खलाशी बचावले, दोन बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 23:05 IST2020-08-15T23:04:44+5:302020-08-15T23:05:31+5:30

दापोली - तालुक्यातील केळशी येथील समुद्रकिनारी बोट संध्याकाळी मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली. बोटीवरील सहापैकी चारजण वाचले असून, अद्याप 2 ...

Boat sinks in Dapoli, 4 out of 6 sailors rescued, two missing | दापोलीत बोट बुडाली, ६ पैकी ४ खलाशी बचावले, दोन बेपत्ता 

दापोलीत बोट बुडाली, ६ पैकी ४ खलाशी बचावले, दोन बेपत्ता 

दापोली - तालुक्यातील केळशी येथील समुद्रकिनारी बोट संध्याकाळी मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली. बोटीवरील सहापैकी चारजण वाचले असून, अद्याप 2 जण बेपत्ता आहेत.
केळशी येथील मकबुल शेखअली चाऊस यांच्या मालकीची  माशाल्ला नावाची यांत्रिक बोट मासेमारीकरिता समुद्रात गेली होती. खाडीत परत येते वेळी वादळामुळे अचानक आलेल्या लाटांमुळे केळशी खाडीचे तोंडाजवळ नस्तावर बोट पलटी होऊन बुडाली.
बोटीवरिल ६ खलाशी पैकी ४ खलाशांना दुसऱ्या  बोटीने वाचवण्यात यश आले आहे. अजून ही २ खलाशी बेपत्ता असून त्यांचा शोध चालू आहे.

Web Title: Boat sinks in Dapoli, 4 out of 6 sailors rescued, two missing