शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे वाडा वेसरोड येथे आरंभ ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. डेरवण येथील ...

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे वाडा वेसरोड येथे आरंभ ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. डेरवण येथील वालावलकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटर मेडिकल कॉलेज सावर्डे यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यासाठी डॉ. प्रताप शेट्ये आणि रवी अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले.

गौरीचे ओवसे उत्साहात

दापोली : तालुक्यातील बुरोंडी गोमराई गावामध्ये गौरीचे औसे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम झाला. गौराईचे आगमन होताच महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. या महिलांनी गौरीची पूजा करून कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळू दे, असे गाऱ्हाणे घातले.

उद्बोधक कार्यशाळा

दापोली : दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळ आणि महाविद्यालय वार्षिकांक प्रकाशन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लिहिते व्हा, लेखक बनण्याच्या दृष्टीने अग्रेसर पाऊल या विषयावर उद्बोधक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रंथपाल कीर्ती परचुरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

जहाजावर गणराया

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावातील सुमित चिंगळे हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये मरिन इंजिनीअर असल्याने जहाजावरच त्यांनी गणेशमूर्ती स्थानापन्न केली आहे. या ठिकाणी आरती, पूजा, प्रसाद आदी धार्मिक विधी केले जात आहेत. इच्छा असूनही त्याला गावी येणे शक्य नसल्याने त्याने आपल्या कर्तव्याच्या ठिकाणीच गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.

तिकीट तपासणी सुरू

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत जवळपास २५३ फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा बसावा, यासाठी कोकण रेल्वे मार्गाच्या स्थानकांवर तसेच गाड्यांमध्ये कसून तिकीट तपासणी केली जात आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी गर्दी नियंत्रण सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी आरसीएफ कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त रेल्वे सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.