शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनच्या निधीवरून रत्नागिरीत भाजपची उघड नाराजी, माजी आमदार विनय नातू यांच्या आरोपाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:25 IST

आधी कदम, आता सामंत यांच्यावर टीका

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. यामध्ये एक कोटी ६२ लाख रत्नागिरी, तर ३६ लाख निधी चिपळूणच्या दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी देण्यात आला. उर्वरित अन्य सात तालुक्यांत एकही निधी देण्यात आला नसून, केवळ रत्नागिरी आणि राजापूरच्या कंत्राटदारांसाठी या निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विनय नातू यांनी केला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीमध्ये पुन्हा एकदा जोरदार जुंपली आहे.खासदार नारायण राणे चिपळूणच्या दौऱ्यावर आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात निधी वाटपावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. खासदार राणे यांनी हा विषय सौम्य केला असला, तरी आता गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे डॉ. विनय नातू यांनी पालकमंत्र्यांच्या निधी वाटपावरील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या सचिव स्तरावरून या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी नातू यांनी केली आहे.

जनावरांना तपासण्याच्या जागी पेव्हर ब्लॉक?जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २१ कामे नियोजन मंडळाने मंजूर केली. ही सर्व कामे बांधकामाची आहेत. दवाखान्याच्या बाहेरील रिकामी जागा जनावरांना तपासण्याची असते. पण त्या ठिकाणी पेव्हर ब्लाॅक बसविले जात आहेत, असा आक्षेप डॉ. नातू यांनी घेतला आहे.

चार तालुक्यांना निधीच नाहीजुन्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन बांधकामे सुरू आहेत. यामध्ये दवाखान्याला फाॅल सिलिंग करणे हेही काम मंजूर आहे. या सर्व कामांमध्ये असे दिसून येत आहे की, ७६ लाखांची कामे रत्नागिरी तालुक्याला, ३१ लाखांची कामे राजापूरला, ४२ लाखांची कामे चिपळूण तालुक्यात, ५ लाखांची कामे संगमेश्वरात, ३ लाखांची गुहागरात, तर अन्य उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना निधीच नसल्याची बाब निदर्शनास आली असल्याचे डॉ. नातू यांचे म्हणणे आहे.

आधी कदम, आता सामंत यांच्यावर टीकाडॉ. नातू यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे. कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून त्यांनी राज्यमंत्री कदम यांच्यावर निशाणा साधला होता. आता जिल्हा नियोजनच्या निधीवरून त्यांनी पालकमंत्री सामंत यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये फार काही आलबेल नसल्याचेच चित्र दिसत आहे.