जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप पुरुन उरेल- चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 13:06 IST2020-01-07T13:05:02+5:302020-01-07T13:06:34+5:30
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप महाविकास आघाडीला पुरून उरेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. भाजप कार्यकर्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेण्यासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप पुरुन उरेल- चंद्रकांतदादा पाटील
रत्नागिरी - राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप महाविकास आघाडीला पुरून उरेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. भाजप कार्यकर्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेण्यासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत.
गृह खातं जरी राष्ट्रवादीकडे असले तरी याचे मॉनिटरिंग आपण करावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निर्रथक आहे.
अर्थात माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान शिक्षण मंत्र्यांचा एकाच विद्यापिठाच्या डिग्रीचा योगायोग बघून गंमत वाटते, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. वारकरी विद्यापीठाच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी हे विद्यापीठ व्हायलाच पाहिजे, असे मत व्यक्त केले.