Ratnagiri Politics: राजेश सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:52 IST2025-11-06T13:50:33+5:302025-11-06T13:52:42+5:30
अशावेळी आपण भाजप जिल्हाध्यक्ष पदावर राहणे योग्य नाही

Ratnagiri Politics: राजेश सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, म्हणाले..
रत्नागिरी : माझ्या मुलीने उद्धवसेनेकडे रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची मागणी केली आहे. अशावेळी आपण भाजप जिल्हाध्यक्ष पदावर राहणे योग्य नाही, अशी भूमिका घेत राजेश सावंत यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. बुधवारी ५ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. चिपळूण येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हेही उपस्थित होते. काही वेळानंतर सावंत यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता मोजकेच दिवस शिल्लक असताना त्यांनी दिलेला राजीनामा अधिक चर्चेचा झाला.
माझी मुलगी माजी आमदार आणि उद्धवसेनेचे नेते बाळ माने यांची सून आहे. उद्धवसेनेकडून तिने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागितली आहे. मुलगी विरोधी पक्षाकडून निवडणूक लढवत असताना आपण पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर राहणे योग्य नाही. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. मात्र, भाजपचा सक्रिय सदस्य म्हणून मी महायुतीचेच काम करणार आहे. - राजेश सावंत.