विशाल मिस्टर तर श्रद्धा मिस कॉलेज

By Admin | Updated: December 30, 2014 23:35 IST2014-12-30T21:29:43+5:302014-12-30T23:35:31+5:30

या स्पर्धेत एकूण १८ विद्यार्थी सहभागी झाले होते.

Biggest Mister Oath Shraddha Miss College | विशाल मिस्टर तर श्रद्धा मिस कॉलेज

विशाल मिस्टर तर श्रद्धा मिस कॉलेज

लांजा : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत आयोजित करण्यात आले होते. यावेळी ‘मिस्टर कॉलेज व मिस कॉलेज’ स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान विभागाच्या विशाल पवार याने ‘मिस्टर कॉलेज’, तर श्रद्धा कांबळे हिने ‘मिस कॉलेज’ हा बहुमान पटकावला आहे.लांजा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १८ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत मिस कॉलेज व मिस्टर कॉलेजचा पुरस्कार पटकावणाऱ्या विशाल पवार व श्रद्धा कांबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या आकर्षक पेहरावाने व व्यक्तिमत्त्वाने उपस्थितांची मने जिंकली. परीक्षकांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना या विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली. हा बहुमान पटकावणाऱ्या विशाल पवार व श्रद्धा कांबळे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते हा बहुमान देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर भोसले, सांस्कृतिक विभागप्रमुख काशिनाथ चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम साळवी, सचिव विनय बुटाला, पदाधिकारी नीलेश चव्हाण, राजेश शेट्ये, संजय तेंडुलकर, संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये, उपाध्यक्ष सुनील कुरुप, सचिव मेहमूद रखांगी, आदींसह पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Biggest Mister Oath Shraddha Miss College