मोठी बातमी! निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 05:39 PM2024-02-16T17:39:05+5:302024-02-16T17:40:56+5:30

Nilesh Rane latest News: आमदार भास्कर जाधव यांनी अलिकडेच उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

Big news! Stone pelting on Nilesh Rane's car in front of Bhaskar Jadhav's office Chiplun news | मोठी बातमी! निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर राडा

मोठी बातमी! निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर राडा

- संदीप बांद्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाडीवर चिपळुणात आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला असून, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. या राड्यामुळे जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी अलिकडेच उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेले माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भास्कर जाधव यांच्यावर सणसणीत टीका केली. त्यांचा समाचार घेण्यासाठी आपण त्यांच्या मतदार संघातच सभा घेऊ आणि तेथेच बोलू, असे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता त्यांची शृंगारतळी (ता. गुहागर) येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

गेल्या दोन तीन दिवसात आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे संतापलेल्या जाधव समर्थक कार्यकर्त्यांनी बुधवारी चिपळूण पोलीसांना निवेदन देत नीलेश राणे यांची सभा रद्द करण्याची मागणी केली होती.

शुक्रवारी दुपारी नीलेश राणे गुहागरकडे जाण्यासाठी निघाले होते. साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान राणे यांच्या गाडीसह सर्व ताफा आमदार जाधव यांच्य चिपळुणातील कार्यालयासमोरुन जात असताना अचानक त्यांछ्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. साधारण या पद्धतीचे पडसाद उमटण्याची कल्पना असल्याने पोलीस खात्यानेही तयारी केली असल्याचे दिसत होते. मोठा जमाव जमताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत मसेच धावपळीत सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

Web Title: Big news! Stone pelting on Nilesh Rane's car in front of Bhaskar Jadhav's office Chiplun news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.