शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: सायली बारमध्येच सापडला भक्ती मयेकर हिचा मोबाइल, गुन्ह्यातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:45 IST

याप्रकरणी दुर्वास पाटीलसह चौघांना पाेलिसांनी अटक केली आहे

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील सायली देशी बारमधून गुरुवारी सकाळी भक्ती मयेकर हिचा माेबाइल हस्तगत करण्यात रत्नागिरी शहर पाेलिसांना यश आले. या मोबाईलच्या डाटामधून आणखी काही माहिती हाती लागते का, यासाठी प्रयत्न पाेलिस करत आहेत.वाटद - खंडाळा येथे भक्ती मयेकर हिला सायली देशी बारमध्ये वायरने गळा आवळून मारल्याचे उघडकीस आल्यानंतर अन्य दाेन खुनांचा उलगडा झाला. त्याच ठिकाणी सीताराम वीर याला मारहाण केल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी दुर्वास पाटीलसह चौघांना पाेलिसांनी अटक केली आहे. पाेलिसांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान बारमधूनच मयत भक्ती मयेकर हिचा मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.भक्ती मयेकरचा मोबाइल पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या गुन्ह्यातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. मोबाइलमधील तिचे दुर्वाससोबत झालेले कॉल डिटेल्स, चॅटिंग तसेच सीताराम वीर तिच्याशी फोनवर अश्लील बोलत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस भक्ती मयेकर हिच्या मोबाइलचे सीडीआर तपासणार आहेत. या तांत्रिक तपासातून या गुन्ह्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश पडण्यास मदत होणार आहे.