शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी भूदान

By admin | Updated: October 16, 2015 00:04 IST

चिपळूण तालुका : शांताराम शिंदेंकडून १५ गुंठे जमीन दान

चिपळूण : कादवड येथील ७ आदिवासी बांधवांना घरे मिळावीत, यासाठी शांताराम बाबाजी शिंदे यांनी आपली वडिलोपार्जित १५ गुंठे जमीन दान देऊन कातकरी बांधवांना आपला हक्क मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांना कायमचा निवारा मिळणार आहे. आजकाल जमीन सोन्यापेक्षाही जास्त भावाने विकली जात आहे. जमिनीचा भाव गगनाला भिडला आहे, असे असताना कादवड येथील शिंदे यांनी आपली वडिलोपार्जित १५ गुंठे जमीन मधुकर जाधव, राम अंबाजी जाधव, सुरेश पवार, विश्वास जाधव, प्रकाश पवार, सुरेश निकम, सुप्रिया जाधव यांना बक्षीसपत्राने दान दिली. या आदिवासी बांधवांची कच्च्या स्वरुपाची घरे येथे आहेत. स्थलांतरित म्हणून ते येथे आले होते. घरे असली तरी मूळ जमीन त्यांच्या नावावर नव्हती. ती शिंदे यांच्या नावे होती. आदिवासी बांधवांना स्वत:ची जमीन असावी, यासाठी प्रयत्न सुरु होते. शिंदे यांनी आपली मुले व कुटुंबियांना विश्वासात घेऊन ही जमीन दान दिली. त्यामुळे आदिवासी बांधवांचा जमिनीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला. या जमिनीचे दानपत्र करताना उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, दुय्यम निबंधक जयवंती, तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी दिवाकर केळुसकर व तलाठी गणेश सुर्वे यांनी मोलाची कामगिरी बजावली. आदिवासी बांधवांना आवश्यक ते सर्व सहकार्य महसूलच्या अधिकाऱ्यांनी केल्याने हे दानपत्र यशस्वी झाले. आता लवकरच या सातही आदिवासी बांधवांना आपला हक्काचा सातबारा मिळणार आहे. वर्षानुवर्षे वास्तव्य करूनही आपल्या नावावर नसलेल्या जमिनीचे आपण मालक झालो असल्याचा आनंद आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. याबद्दल सर्व आदिवासी बांधवांनी शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत. शिंदे यांचा आदर्श समाजातील इतरांनी घेतला, तर आदिवासी बांधवांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असे सांगून तहसीलदार पाटील यांनी शिंदे यांना धन्यवाद दिले. (प्रतिनिधी)हक्काचा सातबारा : आदिवासींची पक्के घरे---कादवड येथील आदिवासी बांधव ज्याठिकाणी राहात होते. ती जागा शांताराम शिंदे यांच्या मालकीची होती. आजच्या काळात जमिनीचे दर गगनाला भिडले असताना कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता शिंदे यांनी ही जमीन दान केली आहे. यामुळे आदिवासींना हक्काचा सातबारा मिळणार आहे.कुटुंबियांची साथशिंदे यांनी दान केलेली जमीन ही वडिलोपार्जित आहे. त्यामुळे त्या जमिनीच्या सातबारावर अन्य सदस्यांचीदेखील नावे आहेत. त्यामुळे कुटुंबियांची साथ मिळणे महत्त्वाचे होते. कुटुंबियांनी त्यांना ही साथ दिल्याने भूदानाचे कार्य शिंदे करू शकले.