रत्नागिरीत बेकायदेशीर वास्तव्य, बांगलादेशी महिलेला कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:43 IST2025-05-16T16:43:03+5:302025-05-16T16:43:41+5:30
रत्नागिरी : व्हिसाचा कालावधी संपूनही रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या बांगलादेशी महिलेला ...

रत्नागिरीत बेकायदेशीर वास्तव्य, बांगलादेशी महिलेला कारावास
रत्नागिरी : व्हिसाचा कालावधी संपूनही रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या बांगलादेशी महिलेला न्यायालयाने सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या महिलेला १७ जानेवारी २०२०५ रोजी दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.
सलमा खातून बिलाल मुल्ला ऊर्फ सलमा राहिल भोंबल (३०, रा. सफा टॉवर्स बिल्डिंग, साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेविरोधात शहर पोलिस स्थानकात भारतीय न्यायसंहिता १९५० चा नियम ३ (ए), ६ (ए) विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६चे कलम १४ (अ) व कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी गोसावी यांनी आरोपी महिलेला ६ महिने साधा कारावास व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास १ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी काम पाहिले. तर पैरवी अंमलदार म्हणून महिला हवालदार साळवी व पाटील यांनी काम पाहिले.
९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात
- सलमा ही १६ डिसेंबर २०१६ रोजी ९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे होते. यानंतर तिने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला.
- व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती २०१७ ते २०२५ या कालावधीत अवैधरीत्या भारतात राहत हाेती. या काळात सलमा तिने आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखला आदी बनावट कागदपत्रे तयार करीत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.