शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

देवरुख पुरवठा विभागाचा अजब कारभार

By admin | Updated: January 19, 2015 00:23 IST

चौकशीची मागणी : एकाच दुकानावर अन्य गावांचा भार टाकल्याने ग्राहक नाराज

एजाज पटेल - फुणगूस -देवरुख तालुका पुरवठा विभागाच्या कारभाराची चर्चा सुरु असून, फुणगूस येथील रेशन दुकान चालकाकडे पोचरी येथील स्वतंत्र रेशन दुकानाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. यामुळे एक व्यक्ती दोन दुकानाचा ‘वहाडी’ केल्याने, दुकान चालकाला महिन्यातून अनेकदा फुणगूस येथील दुकानाला कुलूप ठोकूनच, पोचरी येथील रेशन दुकान सांभाळावे लागत आहे. त्यामुळे फुणगूस येथील शिधापत्रीकाधारकांना धान्य उपलब्ध असूनही, वेळेवर धान्य न मिळता हेलपाटे मारावे लागत आहेत. या कारभारामुळे येथील लोकांसाठी येथील रास्त दराचे धान्य दुकान म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था आहे.फुणगूस तसेच कोंड्ये या दोन गावांसाठी संयुक्त असलेल्या येथील रेशन दुकानदाराला या दोन गावामधील सुमारे १५०० शिधापत्रिका धारक जोडलेले आहेत. गेले ४० ते ४५ वर्षे कृ ष्णा मेणे हे दुकान चालक असून, शासनाच्या पुरवठा विभागाकडून आलेले धान्य ग्राहकांना देण्याचे कार्य करीत असताना, देवरुख पुरवठा विभागाने या चालकाकडे पोचरी येथील स्वतंत्र रेशन दुकानाचा ताबा दिल्याने महिन्यातून अनेकवेळा फुणगूस येथील दुकानाला कुलूप ठोकून पोचरी येथील शिधापत्रिकाधारकांची सेवा करावी लागत आहे. त्यामुळे फुणगूस येथील शिधापत्रीकाधारकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.एकीकडे शासन स्तरावरुन अनियमित, तसेच अपुऱ्या येणाऱ्या धान्याची बोंबाबोंब सुरु असताना, दुसरीकडे आलेले धान्यही अशा गोंधळी कारभारामुळे वेळेवर मिळत नसल्याने शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले असून, याबाबत तहसीलदार वैशाली माने यांच्याकडे काही लोकांनी कैफीयत मांडली आहे. मात्र त्यांच्याकडून ऐकण्यापलीकडे कोणतीच कारवई न झाल्याने ‘भिक नको पण कुत्रा आवर’ असं म्हणण्याची वेळ शिधापत्रिकाधारकांवर आलेली आहे. हा त्रास केव्हा संपणार अशी स्थिती झाली आहे. सर्वत्र या प्रकाराच्या चौकशीची मागणी होत आहे.