अबब! खेडमध्ये सापडले तब्बल ८३ गावठी बाँम्ब, संशयित आरोपी ताब्यात
By मनोज मुळ्ये | Updated: March 24, 2023 12:45 IST2023-03-24T12:44:41+5:302023-03-24T12:45:02+5:30
काही दिवसांपूर्वी एका बसच्या टायरखाली गावठी बाँम्ब फुटला होता

अबब! खेडमध्ये सापडले तब्बल ८३ गावठी बाँम्ब, संशयित आरोपी ताब्यात
खेड : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर भरणे येथे बुधवारी रात्री एका घरावर पोलिसानी धाड टाकून सुमारे ८३ गावठी बॉम्ब आणि एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी एका बसच्या टायरखाली गावठी बाँम्ब फुटला होता. त्याचा तपास करताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
भरणे येथील एका घरात शिकारीसाठी वापरण्यात येणारे घातक गावठी बॉम्ब असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री आंबवली मार्गावर असलेल्या कल्पेश जाधव यांच्या घरावर धाड टाकून घराची झडती घेतली असता त्याठिकाणी सुमारे ८३ गावठी बॉम्ब आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी कल्पेश जाधव (रा. भरणे, ता. खेड) याला रात्री चौकशीसाठी ताब्यात घेऊन येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.