Ratnagiri: कंत्राटी शिक्षक कार्यमुक्त, थकीत मानधनाचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:33 IST2025-04-04T16:33:17+5:302025-04-04T16:33:33+5:30
रत्नागिरी : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ...

Ratnagiri: कंत्राटी शिक्षक कार्यमुक्त, थकीत मानधनाचे काय?
रत्नागिरी : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ४५४ कंत्राटी शिक्षकांवर नियुक्ती रद्दची टांगती तलवार निर्माण झाली आहे. या शिक्षकांना ३० एप्रिल रोजी कार्यमुक्त करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त पदांची संख्या १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाहांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय २३ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील ४५४ बीएड, डीएड बेरोजगांराना रोजगार मिळाला होता. त्यांना १५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णयही शासनाने घेतला होता, तसेच त्याचा फायदा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना झाला, तसेच शैक्षणिक समतोल राखण्यास मदत मिळाली.
या कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीनंतर पहिल्या चार महिन्यांचे मानधनच दिलेले नाही. त्यामुळे या थकीत मानधनासाठी कंत्राटी शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागली आहे. हे मानधन कार्यमुक्त होण्यापूर्वी त्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कंत्राटी शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे.