"हे तर अनंत गीते यांचे राजकीय अज्ञान, कारवाईचा निर्णय शिवसेना घेईल", सुनील तटकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:04 PM2021-09-24T19:04:58+5:302021-09-24T19:05:42+5:30

Shiv Sena-NCP Politics News: शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादींचे दैवत असलेल्या शरद पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीबाबत जे वक्तव्य केलं, ते अतिशय निंद्यनीय आहे. त्याबाबतीत त्यांचे खूप राजकीय अज्ञान असेच म्हणावे लागेल

"This is Anant Geete's political ignorance, Shiv Sena will decide the action", Sunil Tatkare | "हे तर अनंत गीते यांचे राजकीय अज्ञान, कारवाईचा निर्णय शिवसेना घेईल", सुनील तटकरेंचा टोला

"हे तर अनंत गीते यांचे राजकीय अज्ञान, कारवाईचा निर्णय शिवसेना घेईल", सुनील तटकरेंचा टोला

Next

चिपळूण - शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादींचे दैवत असलेल्या शरद पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीबाबत जे वक्तव्य केलं, ते अतिशय निंद्यनीय आहे. त्याबाबतीत त्यांचे खूप राजकीय अज्ञान असेच म्हणावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव आणि खासदार सुनील तटकरे यांनी केली. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीप्रसंगी माध्यमांशी बोलत होते. या बैठकीतही अनंत गीते यांच्या निषेधाचा ठरावही करण्यात आला. ("This is Anant Geete's political ignorance, Shiv Sena will decide the action", Sunil Tatkare)

कोरोना, आपत्ती अशा कठीण प्रसंगांमध्ये महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगले काम करत आहे. अशावेळी गीतेंसारख्या ज्येष्ठ माजी संसद सदस्याने असे वक्तव्य करणे हा एक चुकीचा पायंडा असल्याची टीका त्यांनी केली. एका निवडणुकीत ते आपल्यासमोर निसटते विजयी झाले आणि दुसऱ्या निवडणुकीत ते आपल्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झाले. त्याचे शल्य असल्याने त्यांनी माझ्यावर टीका केली तर समजू शकलो असतो. पण आमचे दैवत असलेल्या पक्षाध्यक्षांवर त्यांनी टीका करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. सावर्डे येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गीते यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची किमया निव्वळ शरद पवार यांच्यामुळे शक्य झाली आहे. १०५ आमदार असताना विरोधी बाकावर बसण्याची वेळ अन्य शक्य नव्हते. हे शरद पवारच घडवू शकतात. गीते यांनी केलेल्या टीकेबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी खात्री सर्वांनाच आहे. कारवाई करावी की करू नये, हा सर्वस्वी शिवसेनेचा निर्णय आहे. मात्र अशी वक्तव्ये पुन्हा केली जाऊ नयेत, याची काळजी घ्यायला हवी.

Web Title: "This is Anant Geete's political ignorance, Shiv Sena will decide the action", Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app