रसायनासाठी वापरलेला रिकामा ड्रम गॅस कटरने कापताना झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:58 IST2022-08-29T18:58:18+5:302022-08-29T18:58:49+5:30
स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

रसायनासाठी वापरलेला रिकामा ड्रम गॅस कटरने कापताना झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू
हर्षल शिरोडकर
खेड : शहरातील डाक बंगला परिसरातील एका भंगार दुकानात रसायनासाठी वापरलेला रिकामा ड्रम गॅस कटरने कापत असताना स्फोट झाला. या स्फोटात तरुणाचा मृत्यू झाला. छोटू सोनकर (१८, रा. उत्तरप्रदेश) असे मृत्यू तरुणाचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
खेड शहरातील डाक बंगला परिसरात वैश्य भवनसमोर भंगाराचे दुकान आहे. या दुकानात छोटू हा रसायनाचा रिकामा ड्रम गॅस कटरने कापत होता. या ड्रमचा स्फोट होऊन छोटू गंभीर जखमी झाला. या स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटामुळे भंगाराच्या दुकानातील सामान अस्ताव्यस्त झाले होते.
स्फोटात गंभीर जखमी झालेल्या छोटूला रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याला मृत घोषित केले. त्याचे शव विच्छेदनासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.