शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावर : विनायक मेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:54 AM

politics, Vinayak Mete, ratnagirinews, Maratha Reservation मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावर झाला आहे. आर्थिक मागास दुर्बल घटकासाठी असलेले केंद्राचे आरक्षण राज्य सरकारकडून मिळावे ही मागणी आहे. जर हे आरक्षण दिलं असतं तर मराठा समाजाची जवळपास ६०० पेक्षा जास्त मुल वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिली नसती. सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाजाचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला. ते खेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देमराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावरविनायक मेटे यांचा खेड येथे आरोप

खेड : मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावर झाला आहे. आर्थिक मागास दुर्बल घटकासाठी असलेले केंद्राचे आरक्षण राज्य सरकारकडून मिळावे ही मागणी आहे. जर हे आरक्षण दिलं असतं तर मराठा समाजाची जवळपास ६०० पेक्षा जास्त मुल वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिली नसती. सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाजाचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला. ते खेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी संघटनेचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे उपस्थित होते. सरकारचे जर हे असंच सुरू राहिलं, तर शिवसंग्राम न्यायालयात जाईल, असा इशारा मेटे यांनी दिला आहे. दरम्यान ओबीसी आणि मराठा समाजात तेढ कशी निर्माण होईल हे पाहण्याचे काम सत्ताधारी पक्षातले आणि सरकारमधील काही मंत्री करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जे आऊट डेटेड झालेले नेते आहेत. त्यांना पुढे करून सरकारमधील वड्डेटीवारसारखे माणसे हे काम करत असल्याचा थेट आरोप विनायक मेटे यांनी केला.तर वाढीव वीजबिले देऊन सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घातला आहे, याचा आम्ही निषेध करत असल्याचे मेटे म्हणाले. याबाबत दोन दिवसात ऊर्जामंत्र्यांशी आमची बैठक असल्याची माहिती त्यांनी दिली.कोरोनाची दुसरी लाट आली तर फार वाईट अवस्था असेल असे एकिकडे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे कोविड सेंटर बंद करतायत म्हणजे सरकारचं काय चाललंय हेच कळंत नाही. धोरण निश्चित नाही, निर्णय निश्चित नाही, त्याच्यावरची अंमलबजावणी नाही त्यामुळे हे गोंधळलेलं सरकार असल्याची टिकाही विनायक मेटे यांनी केली आहे. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेPoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरीMaratha Reservationमराठा आरक्षण