शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालिमेत सर्व यंत्रणा ‘पास’

By शोभना कांबळे | Updated: November 9, 2023 17:24 IST

समुद्रातील व्यक्तींना लाईफ बोट, जॅकेट, दोरीच्या सहाय्याने किनाऱ्यावर आणले 

रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आंबोळगड, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, गुहागरमधील वेलदूर, दापोली मधील कर्दे आणि मंडणगड मधील वाल्मिकीनगर या ५ गावांमध्ये व जेएसडबल्यु जयगड, आरजीपीपीएल, कोकण एलएनजी, गुहागर या २ कंपन्यामध्ये, तसेच आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स, अल्ट्राटेक या बंदरावर गुरूवारी चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. यात सर्व विभागांची सज्जता दिसून आली.चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय स्तरावर दोन वेळा बैठक घेऊन विविध विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. रंगीत तालीमच्या अनुषंगाने ७ तारखेला नियोजन करण्यात आले होते.गुरूवारी सकाळी साडेआठवाजल्यापासून विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर होते. यात महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्नीशमन, इंडस्ट्रीयल सेफ्टी ॲण्ड हेल्थ, मत्स्यविभाग, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, आपदा मित्र, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एनडीआरएफ आदी प्रमुख विभागांचा समावेश होता. गावांमधून इशारा देवून सतर्क करणे,आवश्यक साधनसामुग्रीच्या सहाय्याने जखमींना वाचविणे, जखमीना रुग्णवाहिकेपर्यंत नेणे, रुग्णवाहिकेच्यामाध्यमातून आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करणे, समुद्रात असणाऱ्या व्यक्तींना लाईफ बोट, लाईफ जॅकेट,दोरी आदीच्या सहाय्याने वाचवून किनाऱ्यावर आणणे आदी प्रात्याक्षिके विविध विभागांनी या रंगीत तालीमेत सादर केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, मुक्ता भोसले पोलीस उपनिरीक्षक, वेदभूषण करंगुटकर व विक्रांत तेंडुलकर (उपअभियंता बंदर विभाग), सीमा डोंगरे (माहिती तंत्रज्ञ), प्रसाद माईन व रमेश तडवी (महसूल सहायक) आदींनी जिल्हास्तरावरुन या रंगीत तालीमेचे नियंत्रण केले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcycloneचक्रीवादळ