शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

युवकांसह दारू, गाडी जप्त

By admin | Updated: June 23, 2014 01:38 IST

रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने रविवारी पहाटे दुचाकीवरुन ट्यूबमधून गावठी हातभट्टीची दारु घेऊन जाणाऱ्या युवकांनी

लांजा : रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने रविवारी पहाटे दुचाकीवरुन ट्यूबमधून गावठी हातभट्टीची दारु घेऊन जाणाऱ्या युवकांनी गस्त घालणाऱ्या उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या गाडीला पाहताच गाडी सोडून धूम ठोकली. मात्र, उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दारूसह गाडी जप्त केली आहे. गोवा - मुंबई महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दारुची वाहतूक होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ केली होती. याचवेळी लांजा निरीक्षक कार्यालयातील प्रभारी निरीक्षक सूरज दाबेराव, भरारी पथकाचे निरीक्षक प्रमोद कांबळे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, सुरेश शेगर, राम पवार, करण धुणावत, शशिकांत पाटील यांचे पथक रविवारी पहाटे लांजाहून पालीच्या दिशेने महामार्गावर गस्त घालत होते. याचवेळी आंजणारी पूल येथे महाराष्ट्र उत्पादन शुल्कची गाडी पाहताच रत्नागिरीकडून येणाऱ्या स्वाराने निवसरमळा येथे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी सोडून धूम ठोकली. आपली गाडी पाहून मोटारसायकलस्वार गाडी टाकून का पळून गेले, याचे त्यांना आश्चर्य वाटले. पुलावरुन गाडी पुढे नेऊन पाहिल्यानंतर ट्यूबमध्ये ५ हजार रुपये किमतीची १०० लिटर दारु सापडली. पळून जाणाऱ्या युवकाचा शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत.तत्काळ महाराष्ट्र उत्पादन शुल्कचे प्रभारी निरीक्षक सूरज दाबेराव यांनी होंडा कंपनीची ३० हजारांची मोटारसायकल (एमएच ०७ के ५८५६) व गावठी दारुजप्त केली आहे. मोटरसायकल सोडून धूम ठोकलेल्या व गावठी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या युवकांना उत्पादन शुल्कचे कर्मचारी शोध घेत आहेत. गेल्या दोन दिवसांत उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही सलग दुसरी कारवाई आहे. काल रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत ११ लाख रूपयांचा मद्यसाठा जप्त केला होता. गोवा बनावटीच्या दारूची किती आयात होते, हे यावरून दिसून येते. (प्रतिनिधी)