Ratnagiri: देवडेच्या सुकन्येनेने मालदीवमध्ये केली ‘सुवर्ण’कामगिरी

By शोभना कांबळे | Published: May 2, 2024 05:04 PM2024-05-02T17:04:41+5:302024-05-02T17:04:59+5:30

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिने मालदीव देशात झालेल्या ६ व्या एशियन कँरम ...

Akanksha Kadam of Devde village in Ratnagiri district bagged two gold medals and one bronze medal in the 6th Asian Carrom Championship 2024 held in Maldives | Ratnagiri: देवडेच्या सुकन्येनेने मालदीवमध्ये केली ‘सुवर्ण’कामगिरी

Ratnagiri: देवडेच्या सुकन्येनेने मालदीवमध्ये केली ‘सुवर्ण’कामगिरी

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिने मालदीव देशात झालेल्या ६ व्या एशियन कँरम चँम्पीयन २०२४ या आंतरराष्ट्रीय कँरम स्पर्धेत दोन सुवर्ण व एक ब्रांझ पदक अशा तीन पदकांची कमाई केली.

या स्पर्धेचे यजमानपद हे मालदीव देशाला मिळाले होते. या स्पर्धेत भारतीय संघही सहभागी झाला होता. महिलांच्या चार जणींच्या चमूत देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा उदय कदम हिची संघात निवड झाली होती. विशेष म्हणजे या संघात महाराष्ट्रातून फक्त आकांक्षा ही एकमेव व वयाने सर्वात लहान असलेली खेळाडू सहभागी होती.

आकांक्षाने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत दोन सुवर्ण व एक ब्रांझ पदक अशी तीन पदकांची कमाई केली. आकांक्षा ही अगदी कमी वयात संपूर्ण देशभरात नावाजलेली खेळाडू असून आकांक्षाने यापूर्वीही उंच उंच शिखरे चढून यश प्राप्त केले आहे.

आकांक्षाने २०१९ मध्येही मालदीव देशामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पदार्पणातच दोन सुवर्णपदके मिळवून विक्रम केला होता. राज्यस्तरावरील खुल्या गटाचे तब्बल नऊ वेळा तिला विजेतेपद व तीन वेळा उपविजेतेपद मिळाले आहे. एक हँटरिक आकांक्षाच्या नावे आहे. ज्युनिअर कॅरमचे सलग तीन वर्षे विजेतेपदही आकांक्षाच्या नावावर आहे.
उत्तरप्रदेश वाराणसी येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेची आकांक्षा विजेती आहे राष्ट्रीय शालेय स्पर्धेत आकांक्षाला एक सुवर्ण तर दोन रौप्य पदके मिळाली आहेत.

२०२२ मध्ये पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर येथे झालेल्या नॅशनल कॅरम स्पर्धेची आकांक्षा विजेती असून,आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एक ब्रांझपदक व दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आकांक्षाला दोन कांस्यपदके मिळाली आहेत.

तिला महाराष्ट्र कँरम असोसिएशनचे अरूण केदार, यतीन ठाकूर, भारती नारायण, रत्नागिरी कँरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, मामा आंतरराष्ट्रीय कँरमपटू संदिप देवरूखकर, महेश देवरूखकर व भाऊ यश कदम यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Akanksha Kadam of Devde village in Ratnagiri district bagged two gold medals and one bronze medal in the 6th Asian Carrom Championship 2024 held in Maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.